कात्रज चौक ते भिलारेवाडी रस्त्याचे रुंदीकरण; दीड ते दोन महिन्यांत कामाला सुरुवात
पुणे, 29 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे-सातारा जुन्या महामार्गावरील कात्रज चौक ते भिलारेवाडी या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. विकास आराखड्यानुसार (डीपी) या मार्गाची रुंदी ६० मीटर करण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोजणी, मार्
Fly over pool


पुणे, 29 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे-सातारा जुन्या महामार्गावरील कात्रज चौक ते भिलारेवाडी या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. विकास आराखड्यानुसार (डीपी) या मार्गाची रुंदी ६० मीटर करण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोजणी, मार्किंग, भूसंपादन यासह आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कात्रज चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. कात्रज चौक ते भिलारेवाडी हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande