एसटीमध्ये अप्रेंटिसची संधी; सोलापूर विभागात ३०६ जागांसाठी भरती
सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागामार्फत सन २०२६-२७ या सत्रासाठी ३०६ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती करण्यात येणार आहे. विविध व्यवसायांमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात ये
st


सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागामार्फत सन २०२६-२७ या सत्रासाठी ३०६ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती करण्यात येणार आहे. विविध व्यवसायांमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी Apprenticeship India या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नोंदणी करताना MSRTC Solapur Division या आस्थापनेची निवड करावी. सोलापूर विभागाचा आस्थापना नोंदणी क्रमांक E09162700889 असा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १४ सप्टेंबर २०२६पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, १९०, बुधवार पेठ, सोलापूर – ४१३००२ येथे संपर्क साधता येईल. विभाग नियंत्रक अमोल चंद्रकांत गोंजारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande