पुण्यातील ‘मिसिंग रोड’साठी भूसंपादनाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने आदेश
पुणे, 29 ऑगस्ट, (हिं.स.)। शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित ‘मिसिंग रोड’ची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या रस्त्यांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुण्यातील ‘मिसिंग रोड’साठी भूसंपादनाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने आदेश


पुणे, 29 ऑगस्ट, (हिं.स.)। शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित ‘मिसिंग रोड’ची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या रस्त्यांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर सातत्याने कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘मिसिंग रोड’ची कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

या संदर्भात झालेल्या बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. संबंधित रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन जलदगतीने करून प्रकल्पांच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

‘मिसिंग रोड’ पूर्ण झाल्यानंतर शहरातील विविध भागांमधील वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भूसंपादन आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande