सोलापूरमध्ये दररोज ९० नागरिकांना ‘डायल ११२’मुळे तातडीची पोलिस मदत
सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। शहराची लोकसंख्या १२ लाखांवर, मात्र पोलिस ठाणे अवघे सात असल्याने प्रत्येक घटनेच्या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना वेळेत पोहोचणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत शासनाच्या ‘डायल ११२’ उपक्रमामुळे अडचणीत अ
Cp


सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। शहराची लोकसंख्या १२ लाखांवर, मात्र पोलिस ठाणे अवघे सात असल्याने प्रत्येक घटनेच्या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना वेळेत पोहोचणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत शासनाच्या ‘डायल ११२’ उपक्रमामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना अवघ्या ४.३० ते ५ मिनिटांत पोलिसांची मदत मिळत आहे. सोलापूर शहरात या सेवेद्वारे दररोज सरासरी ९० नागरिकांना पोलिस मदत केली जाते.

शहरात विडी कामगार तसेच एमआयडीसीतील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. बहुतेक कामगारांना बुधवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे बुधवारी कौटुंबिक छळासंदर्भातील महिलांचे सर्वाधिक कॉल ‘११२’वर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ किंवा हाणामारी, अपघात, मोठ्या आवाजात स्पीकर वाजविणे तसेच गोमांस तस्करीसंदर्भातील तक्रारींसाठीही नागरिकांकडून ‘११२’वर मोठ्या प्रमाणात कॉल केले जातात.

‘डायल ११२’च्या माध्यमातून मदत करणाऱ्या पोलिस वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कोणती पोलिस गाडी कोणत्या परिसरात आहे, तिचे लोकेशन तातडीने समजू शकते. अडचणीत असलेल्या नागरिकाचा कॉल आल्यानंतर त्याच्या जवळची पोलिस गाडी शोधून घटनास्थळी पाठविण्यात येते. विशेष म्हणजे ‘११२’वर कॉल करण्यासाठी मोबाईलमध्ये बॅलन्स असणे आवश्यक नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे मदतीपासून वंचित राहावे लागत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande