
छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी अटकेत,
छत्रपती संभाजीनगर, ३ ऑगस्ट (हिं.स.) :लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची सुमारे २९.०२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आरोपीने फिर्यादीला बनावट लॉटरी लागल्याचा विश्वास दिला. त्यानंतर विविध कारणे सांगून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले.
पोलिसांनी आरोपीकडून २६.५ तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण २९.०२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपीविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे बनावट लॉटरी, ऑनलाइन आमिषे आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis