
नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
बाबाज थिएटर्सतर्फे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वेळी ज्येष्ठ कवी राजू देसले, जलतरणपटू तन्वी चव्हाण - देवरे, कवी व सूत्रसंचालक रवींद्र मांलुंजकर यांना सन्मानित करण्यात येणार असून, उपक्रमाचे ७०वे पुष्प आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे, अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नमिता राजहंस प्रस्तुत गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सुमधुर गीतांची मैफल 'सुरों की रानी आशाताई' ही संगीत मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे यांची असून मंगळवारी (ता.१) शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी सहाला कार्यक्रम होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI