
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी परळी वैजनाथ येथे येऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी मंदिरातील धार्मिक विधी व पूजाअर्चा करून प्रभु वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख- समृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर परळीकरांच्या वतीने आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करून प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा व प्रसाद देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis