
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑगस्ट (हिं.स.) हर्सूल पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. दुचाकी चोरीची तक्रार समीर इसाक मोहमोदिन सिद्दिकी यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात दिली होती. सिद्दिकी यांचा गाडीचा शोध घेत असतांना पोलिसाना कोळठाणवाडी परिसरात एक संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बाबा पेट्रोल पंप हर्सूल परिसरातील अशा दोन मोटरसायकल चोरून आणल्याची माहिती दिली सावंगी तलाव परिसरातील भीतीच्या मागे एक खोल खड्डा करून त्या खड्ड्यात लपवून ठेवल्याचे समोर आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis