जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक — पोलीस निरीक्षक अनमोल केदार
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.) - जीवनात सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी क्रीडेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो. मन व शरीर प्रसन्न ठेवण्यासाठी तसेच जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक आहे, असे प्रतिपादन
राष्ट्रीय क्रीडा दिन


बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.) - जीवनात सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी क्रीडेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो. मन व शरीर प्रसन्न ठेवण्यासाठी तसेच जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी केले.

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख होते. प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विवेकानंद कवडे, कार्यालयीन अधीक्षक सुहास कण्व यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विविध क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शामराव देशमुख व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजनंदिनी गित्ते हिची क्रीडाप्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिने उपस्थित विद्यार्थिनींना क्रीडा प्रतिज्ञा दिली.

खेळात पराभव झाला तरी खचून न जाता पुढील विजयासाठी प्रयत्नरत राहावे, असे मत तिने व्यक्त केले. पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी मार्गदर्शन करताना, अध्यक्षीय समारोपात संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी “क्रीडा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थिनींनी कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. खेळामुळे यशासोबतच अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होते,” असे सांगितले. निरोगी जीवनासाठी विविध खेळांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande