पंकजा मुंडे यांच्या बीडमधील नव्या संपर्क कार्यालयाचा लवकरच होणार श्रीगणेशा
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। सातत्याने ''जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा ''जनता दरबार'' लवकरच बीडमध्येही भरणार आहे. शहरातील नगर रोडवरील
पंकजा मुंडे


बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

सातत्याने 'जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा 'जनता दरबार' लवकरच बीडमध्येही भरणार आहे. शहरातील नगर रोडवरील तहसील कार्यालयासमोर त्यांचे संपर्क कार्यालय उभारण्यात येत असून, या कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या नव्या संपर्क कार्यालयाचा महिनाभरात

'श्रीगणेशा' होण्याची शक्यता आहे. पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत 'जनता दरबारा'च्या

माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधण्याची प्रभावी पद्धत निर्माण केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या कार्यालयामुळे बीड विधानसभा मतदारसंघातील भाजपला अधिक बळ मिळणार आहे. राजकीय व संघटनात्मकदृष्ट्याही या नवीन संपर्क कार्यालयाकडे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पाहिले जात आहे. पंकजाताई मुंडे यांच्या 'जनता दरबारा'च्या माध्यमातून बीड मतदारसंघातील विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि पक्षाचा जनसंपर्क या तिन्ही पातळ्यांवर भाजपची सक्रियता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. हे कार्यालय भाजपसाठी नवे पॉवर सेंटर असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande