बम बम बोलेच्या गजराने त्रंबक नगरी दुमदुमली
तिसरा श्रावण सोमवारी कुंभमेळ्याप्रमाणे नियोजन, पोलीस यंत्रणा सज्ज त्र्यंबकेश्वर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यदायी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जाण्यासाठी येथे हजारो भाविक जमले असून बम बम बोले च्या गजराने त्रंबक नगरी दुमदुमली आहे. रविवारी सायंकाळी त्रं
The-city-of-Trambak-was


तिसरा श्रावण सोमवारी कुंभमेळ्याप्रमाणे नियोजन, पोलीस यंत्रणा सज्ज

त्र्यंबकेश्वर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

पुण्यदायी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जाण्यासाठी येथे हजारो भाविक जमले असून बम बम बोले च्या गजराने त्रंबक नगरी दुमदुमली आहे.

रविवारी सायंकाळी त्रंबक मध्ये भाविक देण्यास सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यानंतर कुठेतरी थोडा आराम करणे देवदर्शन करणे स्नान करणे वारी मार्गावर जाणे यासाठी यात्रेकरू नियोजन करून आलेले आहे. अबाल वृद्धांना अशी प्रदक्षिणा करण्याची इच्छा असते. काही भाविक मध्यरात्रीच ब्रह्मगिरीला प्रदक्षिणाला मार्गाला लागले तर काही भाविक पहाटे प्रदक्षिणाला रवाना झाले.

पोलीस खात्याकडून त्र्यंबक नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते. कुंभमेळा बस स्थानकावर जवाहर रोड पोलीस स्टेशन मार्गे सुंदरा बाई मठ कुशावर्त तीर्थ असा मार्ग यासाठी होता. मंदिर दर्शन घेऊन भाविक प्रदक्षिणा मार्गाचा रस्ता धरत होते. सुदैवाने आज पाऊस मोठ्या प्रमाणावर उघडला असल्याने भाविकांना दिलासा मिळालेला आहे.

तिसरा श्रावण सोमवारी तीन लाख भाविकांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सिंहस्थ कुंभमेळ्या प्रमाणे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शहरांमध्ये असलेल्या पंचवटीतील कपालेश्वर या मंदिराला देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे श्रावण मास असल्यामुळे गोदातीरी असेल या मंदिरात नागरिकांची मोठी गर्दी होत असते संपूर्ण भारतामध्ये नंदी नसलेले एकमेव कपालेश्वर हे मंदिर असून या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्ताने मोठी गर्दी सकाळपासूनच होत असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande