
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।माजलगाव धरणासंदर्भात 30 ऑगस्टची माहिती समोर आलेली आहे. जायकवाडीच्या धरणातून या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक मध्ये 100 क्यूसेसने वाढ झाली असून सध्या एकूण धरणामध्ये 1300क्यू सेस ने पाण्याची आवक सुरू आहे. परंतु उजवा कालव्या लागत असलेल्या शेत जमिनी करता पाणी सोडले असल्यामुळे धरणापर्यंत येणारे पाण्याचे आवकमध्ये खूप मोठी घट झालेली आहे. माजलगाव धरण सध्या 24 टक्के इतका भरलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis