फुकेत–दिल्ली एअर इंडिया विमानाला तीव्र हवेच्या धक्क्यांचा फटका; काही प्रवासी, कर्मचाऱ्यांना दुखापत
नवी दिल्ली , 04 ऑगस्ट (हिं.स.)।एअर इंडियाच्या फुकेत (थायलंड) येथून दिल्लीकडे येणाऱ्या एआय2379 या विमानाला मंगळवारी काही काळ तीव्र हवेच्या धक्क्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला. यामुळे विमानाच्या उंचीत अल्पकाळासाठी काही प्रमाणात चढ-उतार झाला.मा
फुकेत–दिल्ली एअर इंडिया विमानाला तीव्र हवेच्या धक्क्यांचा फटका; काही प्रवासी, कर्मचाऱ्यांना दुखापत


नवी दिल्ली , 04 ऑगस्ट (हिं.स.)।एअर इंडियाच्या फुकेत (थायलंड) येथून दिल्लीकडे येणाऱ्या एआय2379 या विमानाला मंगळवारी काही काळ तीव्र हवेच्या धक्क्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला. यामुळे विमानाच्या उंचीत अल्पकाळासाठी काही प्रमाणात चढ-उतार झाला.मात्र विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले आणि यात कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही

प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीमध्ये सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. एअर इंडियाने सांगितले की, सध्या कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही.

प्रवक्त्यांनी सांगितले की, काही प्रवासी आणि विमानातील काही कर्मचारी सदस्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे. एअर इंडियाची विमानतळावरील टीम आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांची काळजी घेत आहेत.

एअर इंडियाने म्हटले आहे की, प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षितता व आरोग्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रभावित व्यक्तींना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाच्या फुकेत–दिल्ली या उड्डाणादरम्यान विमानाची उंची अचानक ३०० फूटांनी कमी झाली होती. पायलटने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत विमानातील एका कर्मचारी सदस्याला गंभीर दुखापत झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande