मामाचा गोवा सुसाट वेगात; थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० तर दुसऱ्या आठवड्यात २००च्या वर
मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.)। प्रदर्शनानंतर प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दमदार माऊथ पब्लिसिटीमुळ
Goa


मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.)। प्रदर्शनानंतर प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दमदार माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपटाकडे नव्या प्रेक्षकांचा ओघही वाढत असून, कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स, भावना आणि भरपूर मनोरंजनाचा सुरेख मेळ साधणाऱ्या या चित्रपटाला ‘परफेक्ट फॅमिली एंटरटेनर’ म्हणून पसंती मिळत आहे. दैनंदिन धकाधकीतून दोन तासांचा निव्वळ आनंद देणारा हा चित्रपट अनेकांसाठी खरा ‘स्ट्रेसबस्टर’ ठरत आहे.

अर्थात स्क्रीन मिळावेत या विनंतीनंतर तुरळक ठिकाणी सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या या सिनेमाच्या थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० होती ती आता दुसऱ्या आठवड्यात २०० च्या वर गेली आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांनी ‘परदेशी’ सिनेमाकडून ‘देशी’ कडे मोर्चा वळवलाय. “खऱ्या अर्थाने एंटरटेनर फिल्म,” “सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसते हसलो,” अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. चित्रपट पाहून बाहेर पडलेले प्रेक्षक आपल्या मित्र-परिवारालाही हा चित्रपट पाहाण्याची शिफारस करत असल्याने त्याची माऊथ पब्लिसिटी दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत आहे.

दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील सहकाऱ्यांकडून मिळणारं प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. प्रेक्षक चित्रपटाचा मनापासून आनंद घेत आहेत, हसत आहेत आणि थिएटरमधून बाहेर पडल्यावरही चित्रपटाची चर्चा करत आहेत, हीच आमच्या मेहनतीची खरी पावती आहे. ज्यांनी अजून चित्रपट पाहिलेला नाही, त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन हा मनोरंजनाचा आणि मनसोक्त हसण्याचा भन्नाट प्रवास नक्की अनुभवावा.’’

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande