अमरावती : नांदगाव तालुक्याला नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)| नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने घरे पूर्णता पडली घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेकांचे घरावर उपासमा
नांदगाव तालुक्यातील पूरग्रस्त शेकडो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्याना घेराव


अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)| नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने घरे पूर्णता पडली घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेकांचे घरावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवसेना उबाठा चे समन्वयक नांदगाव न.पं. चे गटनेते प्रकाश मारोटकर यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी यांना घेराव करून नांदगाव तालुक्याला नुकसान भरपाईचे विशेष पॅकेज देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

एक आठवड्यापूर्वी ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सतत ३५ तास मुसळधार पावसाने कहर केला असून २९६ मि.मि. पाऊस आला आहे. शेतकऱ्यांचे शेतात नदीच्या पूराचे पाणी साचल्याने शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांची उभी पिके शेतासह खरडून गेली सोयाबीन, कापूस, तूर फळपीक, भाजीपाला इत्यादि पिके जळून गेली त्यामुळे शेतकऱ्यांन उत्पन्न होणार नाही महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यात झाले असून मंगरुळ चव्हाळा, धामक, धानोरा शिक्रा, शिवणी व नांदगाव शहरातील शेकडो नागरिकांचे घरात पाणी गेल्याने घरातील संपूर्ण अन्नधान्य कपडे भांडे, विद्यार्थ्यांचे पुस्तके संपूर्ण खराब झाले अनेकांचे संसार उघड्यावर आलेत असून राहायला घर राहिले नाही दुसरीकडे शेतातील पिकांन सोबतच शेती उपयोगी स्पिंकलर पाईप, टिनपत्रे, ताराचे कुपन, बांधलेल्या विहिरी सुध्दा खचल्या पाण्याची मोटर कृषी पंपाचे इलेक्ट्रिक पोल पडले आणि सोलरचे कृषी पंप खराब झाले.

कांदा चाळ मधील कांदा खराब झाला अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गायी, बैल,बकऱ्या कोंबड्या सुद्धा वाहून गेल्या शेतात जाणारे पांधान रस्ते, पूल,बंधारे, छोटे नाले, डांबरी रस्ते पूर्ण वाहून गेले त्यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे शासनाने तुटपुंजी मदत न करता नुकसान संपूर्ण भरपाईसाठी तालुक्याला विशेष मदतीचे पॅकेज देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या वेळी बाळासाहेब राणे, आशिष भाकरे यांचेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande