रत्नागिरी : कर्जमुक्तीपोटी १२ कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँकेत जमा
रत्नागिरी, 7 ऑगस्ट (हिं.स.) । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत जिल्ह्यातील २ हजार ८३२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तब्
रत्नागिरी : कर्जमुक्तीपोटी १२ कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँकेत जमा


रत्नागिरी, 7 ऑगस्ट (हिं.स.) । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत जिल्ह्यातील २ हजार ८३२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तब्बल १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपयांचा निधी बँकांमध्ये जमा झाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी दिली.

शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी पहिला हप्ता कर्जखात्याला वितरित केला आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६ कोटी ८१ लाख ९४ हजार तर इतर राष्ट्रीय, ग्रामीण, पत बँकांमधील खात्यात ६ कोटी ११ लाख ७४ हजार ६७८ रुपयांचा निधी वितरित केला आहे. अजूनही पात्र शेतकऱ्यांची यादी पडताळणीचे काम सुरू आहे. पुढचा हप्ता पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande