भुगावच्या १५ खेळाडू राष्ट्रीय, एकाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील भुगाव येथील आदर्श विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील आपली गौरवशाली परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी खो-खो आणि आट्यापाट्या या पारंपरिक मैदानी खेळांमध्ये उत्कृष्
खो-खो व आट्यापाट्यांत १५ खेळाडू राष्ट्रीय स्तरावर, एकाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड


अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील भुगाव येथील आदर्श विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील आपली गौरवशाली परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी खो-खो आणि आट्यापाट्या या पारंपरिक मैदानी खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल १५ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविले असून, एका खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सरावाची संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे आदर्श विद्यालयाच्या या कामगिरीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शाळेच्या क्रीडा विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे खो-खो व आट्यापाट्या या खेळांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी सातत्याने उंचावत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्याध्यापक वैभव काळे यांनी सांगितले की, या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्यासह शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि शाळा व्यवस्थापनाचे मोलाचे योगदान आहे.

राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये राधा बोबडे, भाविका ठाकरे, अक्षरा धुमाळे, सृष्टी कडू, मेघा हूड, वेदिका हूड, स्नेहा भिसे, आनंदी हरणे, अक्षरा चिंचोळकर, सानिका सोलव, जानवी कडू, अश्विनी कडू यांच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश आहे.

या यशासाठी मुख्याध्यापक वैभव काळे, क्रीडाशिक्षक निकेश शिंगणे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, क्रीडा मार्गदर्शक प्रदीप भुरे, राम धंडारे तसेच माजी मुख्याध्यापक राजेंद्र गादे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा यशाचा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande