
नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
50 वर्षात तब्बल 304 परीक्षा आणि 38 पदव्या प्राप्त करणारे शिराढोण ता.कंधार या गावचे भूमिपुत्र डॉ.गोविंद नांदेडे यांचा आंतरराष्ट्रीय लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने नुकताच मुंबई येथे सन्मानपत्र मेडल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला .
संभाजीनगर, तरोडा (बु.) नांदेड येथील निवासस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
डॉक्टर गोविंद नांदेड यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे आंतरराष्ट्रीय लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने त्यांचा सन्मान देखील केला याचा गौरवपूर्ण उल्लेख आमदार चिखलीकर यांनी केला नांदेड जिल्ह्यातील सुपुत्राने केलेली कामगिरी मोठी असल्याचे ते म्हणाले
यावेळी अवध अवधूतराव क्षीरसागर, वेदांत क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे, बन्नू देशमुख, संदीप पावडे आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis