जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती देण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेली मृद व जलसंधारणाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास न्यावीत. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून नाला खोलीकरणासह विवि
अ


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेली मृद व जलसंधारणाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास न्यावीत. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून नाला खोलीकरणासह विविध जलसंधारण कामांना गती द्यावी. तालुकास्तरीय यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान २.० च्या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) कपिल बिडकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत विभाग, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महसूल, भूमी अभिलेख तसेच मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले.

बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) २.०, 'कॅच द रेन' (Catch the Rain Portal) अभियान तसेच अ सेट मॅपिंग (Asset Mapping) अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण उपचार व उपाययोजनांच्या प्रगतीचे परीक्षण करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत नाला खोलीकरणाच्या कामांवर विशेष भर देण्यास सांगितले. येत्या पावसाळ्यात अधिकाधिक जलसंचय होण्यासाठी सर्व कामे दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करावीत. विविध विभागांनी परस्पर समन्वय राखून जलसंधारणाच्या कामांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच 'कॅच द रेन' पोर्टलवरील माहिती वेळेत अद्ययावत करणे, असेट मॅपिंगची कामे पूर्ण करणे आणि जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande