अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट? ‘जुने फर्निचर विक्रीसाठी’ची माहिती; सायबर सेलमध्ये तक्रार!
अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या नावाने फेसबुकवर असलेल्या एका संशयास्पद अकाउंटवरून ‘जुने फर्निचर विक्रीसाठी आहे’ अशी माहिती आल्याचा प्रकार समोर आला आहे. या अकाउंटबाबत संशय निर्माण झाल्यानंतर , पूर्णाजी निरंजन खोडके य
Photo


अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या नावाने फेसबुकवर असलेल्या एका संशयास्पद अकाउंटवरून ‘जुने फर्निचर विक्रीसाठी आहे’ अशी माहिती आल्याचा प्रकार समोर आला आहे. या अकाउंटबाबत संशय निर्माण झाल्यानंतर , पूर्णाजी निरंजन खोडके यांनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे..

७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘वर्षा मीना’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पूर्णा खोडके यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर संबंधित अकाउंटवरून जुने फर्निचर व इतर विक्रीसाठी असल्याची माहिती देण्यात आल्याचे खोडके यांनी तक्रारीत नमूद केले आहे..

सदर अकाउंटच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर खोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागाकडे तक्रार दाखल करून संबंधित अकाउंटची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

या तक्रारीसोबत संबंधित फेसबुक अकाउंटचे स्क्रीनशॉट, अकाउंट लिंक आणि उपलब्ध माहिती पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे. संबंधित अकाउंटला अनेक नागरिक जोडलेले असल्याने भविष्यात कोणाची फसवणूक किंवा अन्य गैरप्रकार होऊ नये, यासाठी तातडीने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अकाउंट नेमके कोणी तयार केले? चौकशीनंतर स्पष्ट होणार!

सदर फेसबुक अकाउंट खरोखर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आहे की त्यांच्या नावाचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीने तयार केले आहे, तसेच त्यामागील नेमका उद्देश काय आहे, याचा तपास आता सायबर सेलच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

नागरिकांनी सोशल मीडियावर जिल्हाधिकारी, अधिकारी अथवा अन्य प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने असलेल्या संशयास्पद अकाउंटबाबत सतर्क राहावे आणि कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे...

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande