लोकप्रतिनिधी या नात्याने कोणावरही अन्याय होणार नाही - आ. प्रकाश सोळंके
बीड, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। लोकप्रतिनिधी या नात्याने कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमची प्राथमिक जबाबदारी असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. माजलगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर शहरातील फळ विक
अ


बीड, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। लोकप्रतिनिधी या नात्याने कोणावरही अन्याय होणार नाही, हीच आमची प्राथमिक जबाबदारी असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. माजलगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर शहरातील फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी AIMIM चे इद्रिस पाशा व शेख युसुफ यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत त्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

चर्चेदरम्यान फळ व भाजी विक्रेत्यांसाठी भाडे तत्त्वावर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांसोबतच सर्वसामान्य नागरिक, लहान व्यावसायिक व कष्टकरी घटकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे आणि कोणावरही अन्याय होऊ न देणे, ही आमची कायमची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande