जिल्हा प्रशासनासोबत विकासकामांचा आढावा
नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत विकासकामांचा आढावा घेतला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित विषय आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा स
अ


नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत विकासकामांचा आढावा घेतला

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित विषय आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यातील विशेषता भोकर विधानसभा मतदारसंघातील कामांना गती देण्याची सूचना त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या देखील त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या

यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनीही भोकर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित कामांना अधिक गती देण्याबाबत सूचना केल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande