
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सैनिक मुला-मुलींचे वसतिगृह व विश्रामगृहासाठी विविध अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा तसेच इतर पात्र नागरिकांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
भरतीमध्ये वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा असून प्रतिमाह ₹३१,८७५ मानधन दिले जाणार आहे. सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा असून प्रतिमाह ₹२४,८७५ मानधन आहे.
याशिवाय स्वयंपाकी (महिला) पदासाठी ५ जागा (प्रतिमाह ₹१४,१०६), चौकीदार पदासाठी २ जागा (प्रतिमाह ₹२१,१५९), सफाई कामगार पदासाठी ३ जागा (प्रतिमाह ₹१३,२७१) आणि माळी पदासाठी २ जागा (प्रतिमाह ₹१३,२७१) भरण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक अर्ज, मूळ कागदपत्रे आणि त्यांची छायाप्रत घेऊन १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis