शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना पूर्णपणे ऑनलाइन; मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे कामकाज आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आले आहे. यापुढे मदतीची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयामार्फत वितरित न करता थेट कृषी आयुक्तालयाकडून लाभार्थ्यांच्या बँक
शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना पूर्णपणे ऑनलाइन; मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे कामकाज आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आले आहे. यापुढे मदतीची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयामार्फत वितरित न करता थेट कृषी आयुक्तालयाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेला गती मिळण्याबरोबरच लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती घरबसल्या पाहण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली असून, लाभार्थी आता थेट महाडीबीटी (MahaDBT) संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्जाची प्राथमिक छाननी संबंधित उपकृषी अधिकाऱ्यांकडून केली जाईल. त्यानंतर अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.तालुका कृषी अधिकारी अर्जाची पडताळणी करून तो तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीकडे सादर करतील. संबंधित अर्ज पात्र अथवा अपात्र ठरविण्याचा अधिकार या समितीकडे असेल. समितीने अर्ज फेटाळल्यास संबंधित शेतकऱ्याला जिल्हास्तरीय समितीकडे अपील करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाइन प्रणालीमुळे अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती लाभार्थ्यांना घरबसल्या मिळू शकणार असून, त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जानेवारी २०२६ पासून राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ६ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सुमारे २ हजार ५०० अर्ज अपघाती मृत्यूच्या प्रकरणांशी संबंधित आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande