गेवराई पंचायत समिती येथे बचतगट भवन बांधकामासाठी १ कोटींचा निधी मंजूर
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत गेवराई पंचायत समिती येथे बचतगट भवन बांधकामासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. बचतगट भ
अ


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत गेवराई पंचायत समिती येथे बचतगट भवन बांधकामासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. बचतगट भवन बांधकामाचे भूमिपूजन आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना आमदार पंडित म्हणाले ,महिला बचतगटांना स्वतःचे कायमस्वरूपी कार्यालय मिळावे, बचतगटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून बचतगट भवन बांधकाम मंजूर केले आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचतगटाची चळवळ अतिशय प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराला चालना मिळणार असल्यामुळे गेवराई येथे बचतगट भवन बांधकामाचा शुभारंभ आपण करत आहोत.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात बचतगट चळवळ सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. बचतगट भवनाची इमारत लोकाभिमुख व्हावी, हीच सदिच्छा यानिमित्ताने व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande