आनंदी शिक्षक आणि आनंदी शिक्षणासाठी ‘वन माईल एक्स्ट्रा’ आवश्यक – डॉ. जयंत कुलकर्णी
नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करणारे शिक्षक आणि त्यांच्या प्रेरणेतून आयुष्यात यशस्वी झालेले विद्यार्थी हेच शिक्षक व्यवसायातील खरे समाधान असून, अशा अनुभवातूनच ‘आनंदी शिक्षक आणि आनंदी शिक्षण’ साकार होते, असे प्रतिपादन
अ


नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करणारे शिक्षक आणि त्यांच्या प्रेरणेतून आयुष्यात यशस्वी झालेले विद्यार्थी हेच शिक्षक व्यवसायातील खरे समाधान असून, अशा अनुभवातूनच ‘आनंदी शिक्षक आणि आनंदी शिक्षण’ साकार होते, असे प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटी विद्यापीठ, पुणे येथील अधिव्याख्याते डॉ. जयंत कुलकर्णी यांनी केले.

संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित केशव व्याख्यानमालेच्या ते संस्थेतील सर्व अध्यापकांना मार्गदर्शन करत होते. आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी शैलीत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, कोणतीही कला किंवा कौशल्य सादर करण्यापूर्वी जशी तयारी आवश्यक असते, त्याचप्रमाणे शिक्षकांनी वर्गात प्रवेश करण्यापूर्वी काही क्षण विद्यार्थ्यांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांचा उत्साह किंवा निरुत्साह ओळखून अध्यापन केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी आणि परिणामकारक बनते. आपण बऱ्याचदा हे करतो.

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका किती परिवर्तन घडवू शकते, हे सांगणारी त्यांनी मांडलेली भावस्पर्शी कथा ऐकताना उपस्थित श्रोते भावुक झाले. शिक्षक म्हणून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्या चौकटीबाहेर जाऊन काहीतरी अतिरिक्त करण्याची वृत्ती अंगीकारावी, असे सांगत त्यांनी ‘वन माईल एक्स्ट्रा’ जाण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी संस्थेतील सैनिकी विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वेदायन सायन्स सेंटर आणि उद्यामिता कौशल्य प्रशिक्षण केंद्र या विभागांना भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली. प्रत्येक विभागाने विकसित केलेल्या पंचसूत्री (मॉडेल) संकल्पनेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande