
नंदुरबार , 07 ऑगस्ट (हिं.स.) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात राबविण्यात
आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये तब्बल 214 विशेष आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दि. 01 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9 हजार 967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा व तपासण्यांचा
लाभ घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय
अधिकारी डॉ. तुषार धामणे यांनी कळविली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक (मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाने ही शिबारे जिल्हाभरात राबवण्यात आली.
प्रमुख वैद्यकीय सेवा व आकडेवारी:
एकूण आरोग्य शिबारे: 214
एकूण लाभार्थी: 09 हजार 967 नागरिक
रक्त तपासणी: 02 हजार 076 व्यक्ती
संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी): 367 रुग्ण
मोतीबिंदू शस्त्रक्रिया: एकूण 370 रुग्ण (46 रुग्णांची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे तर
324 रुग्णांची शस्त्रक्रिया कांतालक्ष्मी शहा डोळ्यांचे हॉस्पिटल, नंदुरबार येथे करण्यात आली).
रक्तदान शिबिर: विशेष उपक्रमांतर्गत 167 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.
शासकीय व खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग
या अभियान मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
संलग्नित रुग्णालये, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (नंदुरबार),
जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, डी. पी. गावीत आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय (पथराई),
धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
संलग्नित रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले.
वरिष्ठ प्रशासनाचे मार्गदर्शक नेतृत्व:
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जननायक बिरसा मुंडा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिबिरांचे सूक्ष्म
नियोजन व यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. असल्याचेही डॉ. धामणे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर