छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक दंत विभागाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक दंत विभागाचे उद्घाटन छत्रपती संभाजी नगरचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
Q


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक दंत विभागाचे उद्घाटन छत्रपती संभाजी नगरचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.

या विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दंत चेअर आणि उपकरणे उपलब्ध आहेत. यामुळे विमाधारक कामगार बंधू-भगिनींना दर्जेदार आणि मोफत दंतोपचार सुविधा त्यांच्याच दारात मिळणार आहे.राज्य शासन कामगारांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे. यापुढेही अशाच लोकाभिमुख योजना राबवून आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न राहील.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय स्टाफचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार त्यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande