माजलगाव–तेलगाव रस्ता व धारूर घाट रुंदीकरण कामांचा आढावा
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी अंतर्गत माजलगाव शहरातील नाली बांधकाम, माजलगाव–तेलगाव रस्ता व धारूर घाट रुंदीकरण कामांचा आढावा घेतला राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी पॅके
अ


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी अंतर्गत माजलगाव शहरातील नाली बांधकाम, माजलगाव–तेलगाव रस्ता व धारूर घाट रुंदीकरण कामांचा आढावा घेतला

राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी पॅकेज अंतर्गत माजलगाव ते केज दरम्यान प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांच्या अनुषंगाने आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी हा माजलगाव शहरातून जात असल्याने मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यांचा प्रश्न शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरातील नाल्यांचे सर्वेक्षण करून पाण्याचा योग्य एक्झिट पॉइंट निश्चित करण्यात आला आहे. तसेच नाली बांधकामासाठी आवश्यक असलेली ८ फूट रुंदीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. या कामामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय होण्यासोबतच वाहतुकीची कोंडी कमी होऊन नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल आणि पार्किंगचीही अधिक सोयीस्कर व्यवस्था निर्माण होईल.

धारूर घाटाच्या रुंदीकरणाचा विषय सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. प्रस्तावित चार पदरी घाट रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबत तातडीने सर्वेक्षण करून खाजगी जागेची आवश्यकता किती आहे, याचा सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच माजलगाव–तेलगाव मार्गावर सातत्याने घडणारे अपघात लक्षात घेता हा रस्ता एमएसआरडीसी मार्फत तातडीने दर्जेदार पद्धतीने विकसित करून सुस्थितीत आणावा व त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande