
बीड, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। विविध विकासकामांच्या मागण्यांसंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांची माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली. माजलगाव मतदारसंघातील प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांबाबतची मागणी शिवेंद्रराजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे करण्यात आली.
यामध्ये पुढील महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
• माजलगाव (जि. बीड) येथील महसूल कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीच्या बांधकामाच्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.
• माजलगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात संरक्षण भिंत, प्रवेशद्वार (Entry Gate), सिमेंट काँक्रीट रस्ता, सिमेंट काँक्रीट नाली तसेच व्हीआयपी रेस्ट हाऊससाठी आवश्यक फर्निचर आदी कामांच्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.
• माजलगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, फर्निचर व इतर अनुषंगिक कामे (टप्पा–२) यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे.
• माजलगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.
माजलगाव मतदारसंघातील प्रशासकीय पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असून, संबंधित प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis