
नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून विविध मार्गावर हे काम सुरू करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी वादावादी प्रसंग देखील घडत आहेत. महानगरपालिकेतील अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या या मोहिमेला अनेकांचा विरोध आहे
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्या मागील सुधाकरराव टाक धानोरकर यांच्या जागेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने रस्त्या संदर्भात जेसीबीने जमीन सपाटीकरण करण्यात येत होते यामुळे धानोरकर परिवार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी विविध घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis