
जळगाव, 07 ऑगस्ट (हिं.स.) मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahalT मार्फत हस्तांतरण पूर्ण झाले असून, महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार maharashtra.gov.in या डोमेनवर सर्व संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत. हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्याने संबंधित सात संकेतस्थळे तात्पुरती अनुपलब्ध होती. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील संकेतस्थळे नव्या डोमेनवर उपलब्ध झाली आहेत.
१. मराठी भाषा विभाग – https://marathi.maharashtra.gov.in
२. भाषा संचालनालय – https://directorate-marathi.maharashtra.gov.in
३. राज्य मराठी विकास संस्था – https://rmvs-marathi.maharashtra.gov.in
४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in
५. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https://marathivishwakosh.maharashtra.gov.in
६. विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) – https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in
७. मराठी परिभाषा कोश – https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in
सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यिक, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व संबंधितांना या नव्या संकेतस्थळांची माहिती व्हावी व त्यांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर