मराठवाड्याच्या विकासाला नवे इंजिन; कलबुर्गी–लातूर रेल्वे प्रकल्प पुढे सरकला
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। ₹4,917 कोटींच्या कलबुर्गी–लातूर रेल्वे प्रकल्पाला वेग; राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष कलबुर्गी–लातूर रेल्वेमार्गासाठी निर्णायक हालचाल; महाराष्ट्राच्या सहमतीची प्रतीक्षा लातूरकरांसाठी दिलासादायक घडामोड; नवीन रे
रेल्वे


लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

₹4,917 कोटींच्या कलबुर्गी–लातूर रेल्वे प्रकल्पाला वेग; राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

कलबुर्गी–लातूर रेल्वेमार्गासाठी निर्णायक हालचाल; महाराष्ट्राच्या सहमतीची प्रतीक्षा

लातूरकरांसाठी दिलासादायक घडामोड; नवीन रेल्वेमार्गासाठी मध्य रेल्वेचा प्रस्ताव

लातूर व मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या कलबुर्गी–लातूर नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (बांधकाम) 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 टक्के खर्च उचलण्यास सहमती द्यावी, अशी विनंती केली आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 157.82 किलोमीटर असून त्यापैकी 96.82 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रात येतो. या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹4,917 कोटी आहे.

सध्या कलबुर्गी आणि लातूर हे रेल्वेमार्गाने सुमारे 345 किलोमीटरच्या वळणावरील मार्गाने जोडलेले आहेत. नवीन मार्ग उभारल्यानंतर दोन्ही शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार असून प्रवासाचे अंतर व वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

प्रस्तावित रेल्वेमार्ग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून जाणार असल्याने या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आर्थिक परतावा अपेक्षित निकषांपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारची सहमती मिळाल्यानंतर प्रकल्प मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande