छ. संभाजीनगर - लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत गट ''क'' संवर्गातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र
छ. संभाजीनगर - लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत गट 'क' संवर्गातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र गट 'क' संवर्ग/लेखा लिपीक पर्यवेक्षीय प्रशिक्षण दिनांक १० ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्तीय कामकाज तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींशी संबंधित विषयांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठीचा तपशीलवार अभ्यासक्रम छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव येथील जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार असून, प्रशिक्षणासाठी आवेदनपत्रासोबत संबंधित कार्यालय प्रमुखांचे शिफारसपत्र विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील गट 'क' संवर्गातील इच्छुक तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून, विशिष्ट मॉड्यूलसाठी स्वतंत्र प्रवेशाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील गट 'क' तसेच लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande