बावधन, धायरी, कात्रजसह चार भागांतील टेकडीफोडीची चौकशी होणार
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील विविध भागांत टेकड्या फोडून प्लॉटिंग आणि बांधकामे करण्याचे वाढते प्रमाण पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. बावधन, मार्केटयार्ड, धायरी आणि कात्रज परिसरातील टेकड्
बावधन, धायरी, कात्रजसह चार भागांतील टेकडीफोडीची चौकशी होणार


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील विविध भागांत टेकड्या फोडून प्लॉटिंग आणि बांधकामे करण्याचे वाढते प्रमाण पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. बावधन, मार्केटयार्ड, धायरी आणि कात्रज परिसरातील टेकड्यांवर सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवावीत. तसेच नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्या असतील, तर त्या त्वरित रद्द कराव्यात, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले.बैठकीत टेकडीफोड, उत्खनन आणि नियमबाह्य विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. संबंधित प्रकरणांची तातडीने चौकशी करून अहवाल सादर होईपर्यंत सर्व कामांना स्थगिती देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.शहरातील सर्व टेकड्यांचे जीआयएस (GIS) आधारित मॅपिंग करून त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा, अशी मागणीही भिमाले यांनी केली. टेकडीवरील उत्खननासाठी पर्यावरण, महसूल आणि नगररचना विभागाची आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे का, तसेच नैसर्गिक जलप्रवाह आणि भूस्खलनाचा अभ्यास करण्यात आला आहे का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.विकास आराखड्यात एखादा परिसर निवासी क्षेत्र म्हणून आरक्षित असला तरी टेकडी सपाट करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे स्पष्ट करत पर्यावरणापेक्षा कोणताही विकास मोठा नसल्याचेभिमाले यांनी सांगितले. टेकड्यांवरील विकासकामांमध्ये १:५ उताराच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या असून, अशा सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande