भीमा नदीच्या पुराचा पटवर्धन कुरोली बंधाऱ्याला फटका
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे भरावे वेगवा
ujani


सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे भरावे वेगवान प्रवाहात वाहून गेल्याचे निदर्शनास आले. भरावे वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दैनंदिन वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.पुरामुळे झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि वाहून गेलेले भरावे युद्धपातळीवर पूर्ववत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याशिवाय भविष्यात अशा प्रकारची हानी टाळण्यासाठी बंधाऱ्याच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी आणि सक्षम उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande