
जळगाव, 07 ऑगस्ट (हिं.स.) राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, जिल्हा उद्योग केंद्राजवळ, जळगाव येथे तासिका तत्त्वावरील (CHB) निदेशक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक विषयासाठी २, एम्प्लॉबिटी स्किल विषयासाठी १ आणि गणित चित्रकला निदेशक विषयासाठी १ अशा एकूण ४ तासिका तत्त्वावरील निदेशकांची आवश्यकता आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी संबंधित विषयातील पदवी, डिप्लोमा किंवा आयटीआय, एम्प्लॉबिटी स्किल पदासाठी एमबीए, बीबीए किंवा बी. सी.ए, तर गणित/चित्रकला निदेशक पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी किंवा डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राचार्य, राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), जळगाव येथे सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर