परळीच्या वाहतुकीबाबत शिवसेना उबाठा पक्षाकडून पोलीस महासंचालकांना निवेदन
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज परळी वैजनाथ येथे भेट दिली आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय आढावा घेतला त्याच बरोबर भेटायला आलेल्या विविध शिष्टमंडळांना भेट देत त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला. याप्रसंगी शि
पोलीस महासंचालकांना निवेदन


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज परळी वैजनाथ येथे भेट दिली आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय आढावा घेतला त्याच बरोबर भेटायला आलेल्या विविध शिष्टमंडळांना भेट देत त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदन त्यांना सादर केले. यामध्ये प्रामुख्याने परळी शहर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले शहर आहे त्याचबरोबर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र ही आहे मात्र सर्वच रस्त्यावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वाहतुकीला अडथळे निर्माण झालेले आहेत. परळी शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात याव्या अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, जगन्नाथ साळुंखे, प्रकाश चव्हाण महेश केंद्रे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande