रत्नागिरी : देवरूखच्या अभिरुचीतर्फे रविवारी 'स्वर-संवाद'
रत्नागिरी, 7 ऑगस्ट (हिं.स.) । देवरूख येथील अभिरुची परिवारातर्फे प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव विविध गायन व संगीत कार्यक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम येत्या रविवारी, दि. ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. रविवारी
रत्नागिरी : देवरूखच्या अभिरुचीतर्फे रविवारी 'स्वर-संवाद'


रत्नागिरी, 7 ऑगस्ट (हिं.स.) । देवरूख येथील अभिरुची परिवारातर्फे प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव विविध गायन व संगीत कार्यक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम येत्या रविवारी, दि. ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार असलेला 'स्वर-संवाद' हा गायन व सांगीतिक संवादाचा कार्यक्रम शैलेश साने यांच्या चिंतामणी मंगल कार्यालयात होणार आहे. या मैफिलीत पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या संगीत परंपरेतील, जयपर-अत्रोली घराण्याचे सुप्रसिद्ध गायक व आकाशवाणी, रत्नागिरीचे संगीतज्ञ पं. प्रसाद गुळवणी यांचे गायन होणार आहे. या कार्यक्रमाला तबला साथ गिरीधर कुलकर्णी (कोल्हापूर) आणि संवादिनी साथ आशीष प्रभुदेसाई (देवरूख) करणार आहेत.

हा कार्यक्रम प्रामुख्याने संगीत जाणीव आणि जागृतीसाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभिरुची परिवारातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande