छ. संभाजीनगर - आ. सतीश चव्हाण यांनी भेट घेतली सुनेत्रा पवार यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथील आमदार सतीश चव्हाण यांनी भेट घेतली. दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स
अ


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथील आमदार सतीश चव्हाण यांनी भेट घेतली. दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला खो-खो संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना क्रीडा विभागाच्या 7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार रोख बक्षीस रक्कम मिळणे अपेक्षीत होते. मात्र ही रक्कम अद्यापही प्राविण्य प्राप्त खेळाडूंना मिळालेली नसून त्यांना ती बक्षीस रक्कम तसेच शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. यासंदर्भात त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande