इर्टिगा कारच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार
देवळा, 07 ऑगस्ट (हिं.स.)। : देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) वळणाजवळ शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे पाच वाजता इर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) व कैलास पुंडलिक देवरे (व
इर्टिगा कारच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार


देवळा, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

: देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) वळणाजवळ शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे पाच वाजता इर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) व कैलास पुंडलिक देवरे (वय ५५) या दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या दुर्दैवी घटनेने देवळा परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास पांडुरंग ठाकरे व कैलास पुंडलिक देवरे, दोघेही रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा, हे हिरो मोटारसायकल (क्र. एमएच ४१ बीएस ३१५२) वरून दहिवडकडून देवळ्याकडे येत होते. त्याचवेळी मारुती इर्टिगा कार (क्र. एमएच ०४ एचयू १२८३) ही देवळ्याकडून दहिवडकडे जात असताना पिंपळगाव (वा.) वळणाजवळ दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली.

डकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की मोटारसायकलवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात इर्टिगा कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande