केंद्रीय गृहमंत्री शहा यांना धाराशिव जिल्ह्यातील विकास प्रश्नावर खासदारांचे साकडे
धाराशिव, 07 ऑगस्ट (हिं.स.)। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची खासदार ओम राजे निंबाळकर यांनी भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. धाराशिवच्या विकासाला ग
Q


धाराशिव, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची खासदार ओम राजे निंबाळकर यांनी भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

धाराशिवच्या विकासाला गती देण्यासाठी पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले

* धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वे प्रकल्पातील उर्वरित तुळजापूर–सोलापूर रेल्वे मार्गाचे तातडीने टेंडर काढून काम सुरू करावे.

* धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.

* कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्राकडून आवश्यक निधीची तरतूद करावी व हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा.

* नांदेड–पनवेल एक्सप्रेसला ढोकी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करावा.

* लातूर–मुंबई रेल्वेला कळंब रोड रेल्वे स्थानकावर थांबा देऊन हजारो प्रवाशांची सोय करावी.

* हरंगुळ–हडपसर रेल्वे सेवा पुणे रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारावी.

* धाराशिव जिल्ह्याच्या वाढत्या औद्योगिक, कृषी व नागरी वीज गरजा लक्षात घेऊन नवीन २०० केव्ही EHV उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी.

* बार्शी टेक्स्टाईल मिल तातडीने पुन्हा सुरू करून तिचे आधुनिकीकरण करण्यात यावे. या उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे बार्शीसह संपूर्ण परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

* प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील ट्रिगर (Trigger) निकषांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे प्रत्यक्षात पीक नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. शेतकरी नियमितपणे विमा हप्ता भरत असतानाही विद्यमान निकषांमुळे त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ट्रिगर निकषांचा फेरआढावा घेऊन स्थानिक स्तरावरील प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची व्यवस्था करावी, तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेत आवश्यक सुधारणा करून कोणताही पात्र शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी तातडीने कार्यवाही करावी.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande