मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात; युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर कारने पाठीमागून मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला.
grdf


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर कारने पाठीमागून मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये घडला. अतिवेगात असलेल्या फॉर्च्युनर कारने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने बोगद्याच्या बाजूला फेकली गेली.

या दुर्घटनेत तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कारमधील इतर तीन जण सुखरूप बचावले. अपघातातील सर्वजण पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमुळे वाकड परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande