
गुजरात मधील भनवड कडे केंद्र बिंदू
नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
- नाशिक तालुक्यासह अन्य पाच तालुक्यांना शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या सर्व परिस्थिती वरती प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी केले आहे.
मागील काही दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसुल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भाग या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हे पसरले असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झालेली आहे
याबाबत उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के हे शनिवारी रात्री 10 वाजून 59 मिनिटांनी जाणवले आहे. रिक्टर स्केल वरती 3.8 एवढी नोंद झाली असून भूकंपाचा केंद्रबिंदू हा गुजरात मधील भनवड या ठिकाणी असल्याचे समोर आलेले आहे.
प्राथमिक उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील पेठ दुंडरी कळवण या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्यास असून सौम्य भूकंपाचे धक्के हे चांदवड देवळा आणि नाशिक तालुक्यात जाणविले आहे त्यातही नाशिक शहरामध्ये भूकंपाचे टक्के आहे जाणविले नागरिकांकडून सांगण्यात येत असून सर्वसाधारण दहा वाजून 59 मिनिटाच्या जवळपास घरातील भांडे , पंखे, खिडक्या वाजल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे . नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन सर्व काळजी घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI