
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट (हिं.स.)। स्वच्छ उर्जेच्या दिशेने वाटचाल आणि हवामान कृती उद्दीष्टे साध्य करणे, या दिशेने मोठा टप्पा गाठत, भारताने 31 जुलै 2026 पर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये 300 गिगावॅटचा टप्पा पार केला आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट क्षमता लक्ष्यापैकी हा 60 टक्के वाटा आहे.
बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमतेचे वर्गीकरण (31.07.2026 पर्यंत)
सौर उर्जा - 164.59 गिगावॅट; पवन उर्जा - 58.14 गिगावॅट; जल उर्जा (मोठे व लहान )- 57.24 गिगावॅट; जैव उर्जा - 11.75 गिगावॅट
अणू उर्जा - 8.78 गिगावॅट; एकूण बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता- 300.50 गिगावॅट देशाच्या एकूण उर्जा निर्मिती क्षमतेमध्ये (सध्या जवळपास 552 गिगावॅट पर्यंत असणारी) बिगर जीवाश्म इंधन उर्जा क्षमतेचा वाटा 54 टक्क्यांहून अधिक आहे.
सरकारने उपलब्ध राबवलेल्या महत्त्वाच्या धोरणात्मक उपाययोजनांच्या बळावर, साध्य झालेली ही उल्लेखनीय कामगिरी, आत्मनिर्भर उर्जा व्यवस्था निर्माण करण्याच्या आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर जीवाश्म क्षमता गाठण्याच्या दिशेने भारताची होत असलेली वेगवान प्रगती अधोरेखित करणारी आहे.
विविध क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट योगदानातून स्वच्छ उर्जा क्षेत्रात मोठी वृद्धी झाली आहे. 2014 मध्ये केवळ 2.8 गिगावॅट असणारी सौर उर्जा सध्या 165 गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचत, या वाढीची प्रमुख चालक ठरली आहे. त्याचबरोबर, पवन उर्जा क्षेत्रानेही मोठी प्रगती करत 2014 मध्ये 21 गिगावॅट असलेल्या क्षमतेवरून 58 गिगावॅटपेक्षा अधिक क्षमता साध्य केली आहे. 2025-26 या कालावधीत देशात 55.29 गिगावॅट क्षमतेची बिगर जीवाश्म इंधनावर आधारित विक्रमी वीज क्षमता उभारण्यात आली. त्यामध्ये प्रमुख वाटा 44.6 गिगावॅट सौर उर्जा आणि 60 गिगावॅट पवन उर्जेचा होता. अक्षय उर्जा क्षमतेतील वेगवान प्रगतीचे प्रतिबिंब, देशातील अक्षय उर्जा निर्मितीमध्येही दिसून येते; ही निर्मिती 2014-15 मध्ये 190.96 अब्ज युनिट वरून वृद्धिंगत होत 2025-26 मध्ये 477.79 अब्ज युनिट इतकी झाली आहे.
या जलद विस्ताराला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील स्वयंपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी भारताने, देशांतर्गत उत्पादन क्षमतांमध्ये आमूलाग्र बदल घडून आणला आहे. उच्च कार्यक्षमता आणि स्वदेशी बनावटीच्या प्रारूपांचा वापर करून निर्माण होणाऱ्या सौर प्रकल्पांच्या उभारणीवर लक्ष देण्यासाठी असलेल्या, उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन योजनेमुळे सोलर पीव्ही मॉडेल्ससाठीच्या मान्यताप्राप्त प्रारूपे आणि उत्पादक यांच्या अंतर्गत, 2014 मध्ये 2.3 गिगावॅट असलेल्या नोंदणीकृत क्षमतेत वृद्धी होऊन तिने 200 गिगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule