
ढाका, 01 सप्टेंबर (हिं.स.)जन्माष्टमीसह इतर हिंदू सणांचा काळ जवळ येत असताना बांगलादेशातील हिंदूंमध्ये सरकारविरोधातील रोष वाढत चालला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे बांगलादेश सरकारने जन्माष्टमीला मिळणारी सरकारी सुट्टी रद्द केली आहे. ढाकेश्वरी मंदिर, चट्टग्राम, सिल्हेट यांसह अनेक मंदिरांमध्ये जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे; मात्र यावेळी जन्माष्टमीची अधिकृत सरकारी सुट्टी असणार नाही.
माहितीनुसार, यावर्षी 2 जानेवारी रोजीच बांगलादेशमध्ये सरस्वती पूजा, जन्माष्टमी, दुर्गाष्टमी आणि बुद्ध पौर्णिमा या सणांच्या सरकारी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. हिंदू जागृती समिती आणि तिच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी याचा तीव्र विरोध केला आहे.
शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ढाका, सिल्हेट, खुलना, कुमिल्ला, जेसोर आणि मीरपूर येथे मोठ्या मिरवणुका काढल्या जात नाहीत. त्यामुळे यंदाही जन्माष्टमीचा उत्साह फिका राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशातील वृत्तपत्रच्या वृत्तानुसार, यावेळी मंदिरांमध्ये जन्माष्टमीचे कार्यक्रम आयोजित केले जातील; मात्र दहा दिवस आधीपासून बाजारपेठांमध्ये दिसणारा उत्साह यंदा दिसून येत नाही.
एकेकाळी बांगलादेशात हिंदू सणांच्या काळात मंदिरांमध्ये मोठा उत्साह असायचा आणि भव्य उत्सव तसेच मिरवणुका काढल्या जायच्या. मात्र आता देशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात दिसणारा उत्साह राहिलेला नाही. बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी देशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत सांगितले आहे की, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून मंदिरांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल.
मात्र, बांगलादेश हिंदू जागरण मंचाचे प्रवक्ते निहार हलदर यांनी सांगितले की, सध्या हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण आहे. काही मंदिरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी शोभायात्रा काढल्या जातील; मात्र बहुतांश ठिकाणी पूर्वीसारखा उत्साह आणि रंगत दिसणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode