पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप: रिझवानसह ७ क्रिकेटपटूंना वगळले, ५ नव्या चेहऱ्यांना संधी
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.) : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघात मोठे बदल केले आहेत. पाकिस्तानने सात क्रिकेटपटूंना वगळले आहे. कसोटी मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लोगो संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.) : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघात मोठे बदल केले आहेत. पाकिस्तानने सात क्रिकेटपटूंना वगळले आहे. कसोटी मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे. गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही कसोटी प्रशिक्षण संघातून हटवण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला, लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी १९४ धावांनी गमावली. यानंतर, पाकिस्तानने संघ आणि प्रशिक्षण स्टाफमध्ये बदल केले आहेत. वगळण्यात आलेल्या सात क्रिकेटपटूंमध्ये मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आगा यांसारख्या अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर, पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे बदल होऊ शकतात असे वृत्त समोर येत आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी, पीसीबीने आपल्या जवळपास निम्म्या संघात बदल केला आहे. त्यांनी सात क्रिकेटपटूंना मुक्त करून संघात तरुण क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. संघातून मुक्त करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंमध्ये मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमिर जमाल, खुर्रम शहजाद आणि अवैस जफर यांचा समावेश आहे.

या सात क्रिकेटपटूंच्या जागी, पीसीबीने ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पाच नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. संघात समाविष्ट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अराफत मिन्हास, मोहम्मद इम्रान ज्युनियर, साद बेग, मोहम्मद इम्रान रंधावा आणि रझाउल्ला यांचा समावेश आहे.

कसोटी सामन्यांचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी, व्हाईट-बॉल प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे रेड-बॉल क्रिकेटचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सरफराज यांच्यासोबतच, कसोटी गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. ॲशले नॉफके यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अराफत मिन्हास, अझान अवेस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद इम्रान, मोहम्मद इम्रान जूनियर, गाझी घोरी (यष्टीरक्षक), रझाउल्लाह, साद बेग (यष्टीरक्षक), सॅम अयुब, साजिद खान, सौद शकील, शान मसूद, उबेद शाह.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande