सारथी प्रणालीवरील १४ सप्टेंबरची अनुज्ञप्ती कामकाजाची नियुक्ती पुढे ढकलली
पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)। १४ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी जाहीर असल्याने, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आळंदी रोड व संगम ब्रिज कार्यालय) येथे सारथी प्रणालीवर अनुज्ञप्ती कामकाजासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्ती घेतलेल्या अर्जदारां
सारथी प्रणालीवरील १४ सप्टेंबरची अनुज्ञप्ती कामकाजाची नियुक्ती पुढे ढकलली


पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

१४ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी जाहीर असल्याने, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आळंदी रोड व संगम ब्रिज कार्यालय) येथे सारथी प्रणालीवर अनुज्ञप्ती कामकाजासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्ती घेतलेल्या अर्जदारांनी त्यांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयात उपस्थित रहावे.

तसेच, ज्या अर्जदारांना दिनांक १५ सप्टेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होणार नाही, अशा अर्जदारांनी १५ ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत. अशा अर्जदारांची दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजीची नियोजित तारीख ग्राह्य धरली जाणार आहे.

संबंधित अर्जदारांनी याची नोंद घेऊन निर्धारित कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande