
पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एनसीसीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश स्वेच्छेने रक्तदान करण्यास प्रोत्साहन देणे तसेच रक्तदानाचे महत्त्व आणि सामाजिक गरज याबाबत जनजागृती करणे हा होता.
या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर २०० हून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि सहभागी या उपक्रमास उपस्थित होते. एनसीसी कॅडेट्सनी शिबिराच्या आयोजन, व्यवस्थापन आणि विविध जबाबदाऱ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
एनसीसी कॅडेट्स, रक्तदाते, आयोजक आणि वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. सामाजिक सेवा आणि समाजकल्याणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. तसेच, सेवा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना जोपासण्याच्या एनसीसीच्या उद्दिष्टांना या उपक्रमातून चालना मिळाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे
कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु