नाशिक : ग्निवीर प्रशिक्षणार्थीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)।नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवकाने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली. अश्विन एम. असे मृत अग्निवीर प्रशिक्षणार्थीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन
नाशिक : ग्निवीर प्रशिक्षणार्थीची गळफास घेऊन आत्महत्या


नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)।नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवकाने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली. अश्विन एम. असे मृत अग्निवीर प्रशिक्षणार्थीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन हा आर्टिलरी सेंटरच्या आर्मी बॅरेकमध्ये राहत होता. त्याने बॅरेकमधील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्या असून पोलीस अधिक तपास करीत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande